Thursday, May 14, 2009

G4G5 part II

जवळ जवळ १० वर्ष मराठी शिकल्यानंतर आणि त्या नंतर अजून १० वर्ष झाल्यावर आज मला फारच basic प्रश्नपडलाय... मराठी मध्ये दोन "" उच्चार का असावेत ? म्हणजे शतकाचा "" आणि षटकोनाचा "" हे वेगवेगळे का आहेत? उच्चारात फारसा फरक जाणवत नाही मला... कदाचित मला याचा उत्तर आधी माहितअसावा.. पण आता नक्कीच आठवत नाहीये....

आज मी बरेच दिवसांनी सकाळी उशीरा उठलोय... आमच्या G4G5 च्या रोयाल राहणीची आठवण होतेय... आमचीसकाळ फारच रेफ्रेशिंग असायची.... "गुरु" मधला हे गाना

जागे है देर तक, हमें कुछ और सोने दो SSS....
थोडी सी रात और है,
सुभाह तो होने दो SSS....
आधे अधूरे ख्वाब जो पुरे हो सके,
एक बार फीर से नींद में वोह खवाब बोने दो SSSSS .......

एकदम apt आहे आमच्यासाठी ....!!!
सकाळी (आमची सकाळ 12.30Pm ला व्हायची .. सूर्यवंशी, सूर्य उगवल्या नंतर उठतात ...आम्ही सूर्य मध्यान्हावार आल्यावर...) सगळ्यात पहिले आम्ही राव च्या रूमवर जमायचो... त्याच्या त्या मंद desktop ला पाटीलचे मस्त स्पीकर्स लावायचे...सगळे तसे एकदम health conscious...सकाळी सकाळी व्यायाम म्हणुनआम्ही बेन्द्र्यांच्या सोनालीचा "चम चम करता है नशीला बदन" - आमचा most most most favourite song लावायाचो... Aerobics साठी ;)
हे गाना आम्ही पूर्ण 3rd year ला रोज सकाळी एकदा तरी ऐकला असावा... final year मध्ये मग "दिल मे बजीगिटार" आणि "सजना जी वारी वारी" ने गाजवला....G4G5 वरच्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मध्ये सगळ्यातगूढ होती ती म्हणजे रंगीला मधल्या "तनहा तनहा यहान पे जीना" या गाण्याच्या video मध्ये Jockey (!) oops.. I mean Jackie Shroff ला पाहून भाईजान चा मिश्कील हास्य !!! का हसायचा तो... माहित नाही !! :P

लोकांच्या music च्या आवडी किती वेग-वेगळ्या असतात हे मला G4G5 वर चांगलाच अनुभवायला मिळाला... Almost सगळ्यांची आवड वेगळीच होती... अमेय ला generally एकदम top quality music आवडता....आणित्यात at least गिटार हवा.....त्याला कधी तुम्ही टीपिकाल हिंदी movies चे गाणे ऐकानता नाहीपाहणार....चिरागला mostly english तर विज्या शुद्ध हिंदी- आणि त्यात पण देवांग पटेल, बाबा सेगल... असलेआता सुधारला आहे तो.. ) केदार ला सगळे टिपिकल bollywood मसाला movies चे मसाला songs - " चांदी केदाल पार सोने का मोर".... राम-लखन चे गाने आणि गुंडा मधला ... "नशा नशा करता है", "डिस्कोडान्सर"....आणि राहुलला सगळे YR production/SRK चे songs (yeah, Its true!!! There are such people on planet Earth)..... पाटील ला फंडू english songs- hard rock वैगरे type....सलील general चांगले हिंदी.... चांगली choice आहे त्याची....

आमच्या आवडी वेगळ्या असल्या तरी आम्ही एकत्र आलो की आम्ही एक मूड मधे असायचो आणि म्हणुन कुठलाही गाण वाजो, आम्ही सगळे enjoy करायचो... The strange thing in life - You can enjoy even the most hated thing, if you have a good company !

Wednesday, May 13, 2009

The Alchemist principle....

सर्व प्रथम वाचकांना सूचना - मराठी लेखनातल्या चुका काढू नये.....!!

तशी आजची सकाळ फारशी स्पेशल नव्हती... मी सकाळी वर्तमानपत्र घेऊन आलो आणि मस्त R D Burman यांचा "हमेन तुमसे प्यार कितना, ये हम नाही जानते.... मगर जी नाही सकते तुम्हारे बिना..." गाणा लावलामाझ्या Zune वर....

पहिलीच बातमी वाचून मनात शंकेची पाल चुकचुकली.... मतदानानिमित्त अमुक तमुक ठिकाणी सुट्टी असाहोता.... मी विचार करत होतो कि हे लोक सुट्टी च्या दिवशी मतदान का नाही घेत? आपका भरोसेमंद कॉंग्रेस मुळेदेशाची अर्थव्यवस्था फारशी सुरळीत नाहीये... ते जब वी मेट मध्ये dialogue आहे ना तसा .... Economy रेल किपटरी कि तरह ही... एक इंच का बेंड और मिलोन कि दुरी...!!

असो !! ( नुकत्यात एका कट्ट्यावरच्या सभेत झालेल्या एका चर्चेत असा निश्फन्ना झालय कि असो आणि ANYWAYS (capital मधे ) हे शब्द तुम्हाला हवा ते बोलून झाल्यावर विषय बदलवण्यासाठी असतात !!! )


आज मला आमच्या G4G5 च्या "अपनी पाव-भाजी" ची फारच आठवण येत आहे.... हि एक नुसती साधारणपाव-भाजी नसून हा एक फंडा आहे .... ;)
ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी - PICT मध्ये असताना आम्ही एकाच मजल्यावर असणाऱ्या G4 आणि G5 यामध्ये मुला + 1 permanent parasite असे राहायचो... इथे आम्ही "जगलोय" !! मजा आणि कॉलेज life काय असता
हे अनुभवला .... :)

एकदा (actually अनेकदा) आम्ही सगळे आमच्या road side restaurant - Happy Guys - मध्ये जेवायलागेलो होतो... कॉलेज मधले दिवस तसे एकदम कडकी चे होते .... पण खिशात पैसे नसले तरी - Live life King Size यावर आम्ही firm होतो... मेनू कार्ड वर पाहून सगळ्यांनी आपापल्या मर्जी नुसार - आलू मटार, आलू पराठा, अमेय चा दाल-भात आणि Mountain Dew, केदार ने त्याची अंडा बिर्याणी - बिना अंड्याची.... असला सगळामागविला.... मी फार्मात येऊन एक पाव-भाजी आन रे संजय असा ओरडलो...
पण तो दिवसच माझा नवता... पाव भाजी ची प्लेट मिनिटात आली.... आणि बाकी सगळ्याला खूप वेळ होता..... आणि हे भुकेले यम माझ्या पाव भाजी वर तुटून पडले... इतकाच नाही.... तर जोडी Extra पाव पण खाऊनगेलेत... खिशात पैसे नसले तरी आम्ही एकमेकांच्या खाण्यावर कधी जायचो नाही... पण शेवटी बिल आला तेंव्हासगळ्यांनी चक्क चक्क हात वर केलेत .... - " छोड ना निल्या... अपनी पाव भाजी थी ना !!! "

त्या दिवसानंतर मी एक महिनाभार तरी पाव भाजी खाण्याची हिम्मत केली नाही... आणि नेमका या पब्लिक नेपण कुठे खाल्ली नसावी... मी आपला ... The Alchemist फंडा नुसार ... - Things that happen once, never happen twice ...एकदा परत पाव भाजी मागवली.... आणि सगळा सेम टू सेम रिपीट... !!!

त्या दिवसापासून कुठल्याही आमची "अपना" ची definition तयार झाली .... अपना ice cream, अपनी तंदुरी, अपना cold drink... सुरु झाला.... अपना म्हणजे अशी गोष्ट ज्याचा उपभोग सगळे घेणार आणि त्यासाठीकुणीतरी एकाच जण pay करणार ;) ...

हे सगळा जोब लागल्यावर पण सुरूच होता.... वर्ष घराचा rent, bills कोण भरताय.. कोणी हिशोबच केलानाही....मी शेवटी flat सोडला तेंव्हा चिराग ने आठवडाभर जवळ जवळ लाखाचा unsettled हिशोब केला..
"छोड राव, तेरे account मे क्या और मेरे क्या ... अपने account मे है ना ... कभीभी कर लेंगे online transfer..." ;)

In short, things that happen twice, are bound to happen thrice..many times.. also... ;)

(To be continued...)

Friday, April 24, 2009

My First blog !! again !!!

Ohk... If you know the history of the my blogs-writing attempts, you will surely laugh.
This is not the first time I am writing my first blog. [:P]

But,all the "great people" maintains their blogs and I really don't want to disappoint my fans !!

And yeah.... My keyBoard name(traditionally known as pen name) is HM. !! I believe I will live upto my name...